पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

एका हुतात्मा स्मारकाचे मनोगत - Eka Hutatma Smarakache Manogat

        या भरचौकात वर्षानुवर्षे उभं राहून राहून माझे पाय शिणलेत. नको नको ते या कलियुगातले नेते, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, पायदळी तुडवले जाणारे सत्य, शिव आणि सौंदर्य, माणुसकीवरच झालेला अत्याचार, गोरगरिबांच्या किंकाळ्या त्यांचे विलाप हे सगळं पाहून नेत्र शिणलेत. कान शिणलेत.         असंख्य चांदण्या आकाशात चमचमताहेत पण या नीरव शांततेत माझ्या मनातल्या विचारांचा हल्लकल्लोळ कुणाला ऐकू तरी जाईल का? कोण ऐकणार माझे दुःख? कोण पुसणार माझे अश्रु?         खरचं काय चाललंय तरी काय? स्वच्छ खादीचे कपडे घालून स्वावलंबी जीवन जगणारा गोरगरिबांची आत्मियतेने सेवा करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी आयुष्य वेचलं. स्वातंत्र्याच्या आंदोलनात एक सच्चा शिपाई म्हणून मी लढलो. कधी कशाचीही अपेक्षा कुणाकडूनही केली नाही. आज मात्र मृत्युनंतर या पुतळ्याच्या रूपानं माझे हे चिंडवडे का निघताहेत तेच कळत नाही.         इथे ना कुणी कधी साफसफाई करत ना कुणी मान वर करून इथला ताम्रपट वाचत. माझं सदेव उन्नत असलेलं हे मस्तक आता जणू कावळ्यांसाठी आ झालयं. जे मस्तक...

बेकार तरुणाचे मनोगत - Bekar Tarunache Manogat

          एकदा एका ऑफिसच्या बाहेर भली मोठी रांग दिसली. या रांगेत सर्व तरुण मंडळी होती. माझ्या मनात उत्सुकता जागृत झाली. ही सर्व मंडळे इथे कशासाठी जमली आहेत? कुतूहलाने मी तिथे उभा राहिलो. अन् त्यातल्या एका तरुणाला त्याबाबत विचारले. त्यावर तो जरा चिडलाच, काय राव थट्टा करता काय आमची? हसा, हसा आता हसताय, पण बाळांनो, शिक्षण झाल्यावर तुम्हालाही यायचंय आमच्या सारख्यांच्या रांगेत. खूप पायपीट करायची शिवाय टोणगा, घोडा, आयतं बसून खातो, लाज नाही वाटत, तुलाच कशी लागत नाही नोकरी? अशी मुक्ताफळे ऐकायची.           मी त्या तरुणाला विश्वासात घेतले, जेव्हा त्याला खात्री पटली मी त्याची चेष्टा करीत नाही तेव्हा तो मनातली व्यथा सांगायला तयार झाला.           काय सांगू दोस्ता तुला, माझं नाव विचारू नकोस. माझं नाव सध्या बेकार तरूण. माझा ठाव ठिकाणा जिथे जाहिरात तिथे अर्ज घेवून जाणे, मुलाखतीला रांगते बसणे, नंतर निराशा पदरी घेवून याच गोष्टीची पुनरावृत्ती काय सांगू तुला. आजकाल जगणं मुश्किल होऊन बसलयं. आईवडिलांना आम्ही मुलं ओझ वाट...

पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त - Pinjaryatil Popatache Atmavrutta

          चला बरे झाले, सर्वजण आपापल्या कामात गुंतलेत नाहीतर जो तो येतो आणि पोपटा राम राम म्हण पोपटा मिठू मिठू बोल असे म्हणून मला हैराण करतात. मला या घरातील हा लहान मुलगा फार आवडतो. तो एकटक माझ्याकडे बघत राहतो. मध्येच हसतो, टाळ्या वाजवतो. त्याच्याकडे पाहातच मी हे कारावासाचं लाजिरवाणं जीवन कसं तरी गोड करून घेतो. लाजिरवाणं नाहीतर काय? इथे काही देशभक्तीच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे ही कैद मिळालेली नाही की अभिमान वाटावा. अर्थात गुन्हेगारीची खंतही नाही. केवळ माणसाच्या प्राण्यांवरील पक्ष्यांवरील प्रेमाचाच हा प्रसाद आहे. काय? पण गंमत काय आहे नाव द्यायचं भूत दया आणि परिणाम कारावास.           'आज मी या पिंजऱ्यात एकटा, एकाकी जीवन जगतो आहे. दिलं ते ते खातो आहे, पाजलं ते पितो आहे. या सान्यांच्या दृष्टीने मी एक खेळण बनलो आहे. असा एकान्त लाभला की, मला माझे बालपण आठवते. मी मनसोक्त विहार करत होतो. बाहेरच्या जगात, रानावनात फिरत होतो. आवडेल ती फळे झाडावर बसून खात होतो. पिंजऱ्यात अडकल्यामुळे मी बाहेरच्या हवेत फिरू शकत नाही.      ...

भूकंपग्रस्ताचे मनोगत - Bhukamgratache Manogat

          मी मूळचा गुजरातमधील भूज गावचा रहिवासी. मी माझ्या घरी माझे आई-वडिल, आजी आजोबा, भाऊ व बहिणी-यांच्यासह राहत होतो. हो होतोच म्हणावे लागेल. कारण त्यांपैकी छोटी बहिण सोडली तर आता कोणीही हयात नाही. त्या सर्वांना धरणीमातेने गिळून टाकले आहे. काळाने पडद्याआड केले आहे. मी एक भूकंपग्रस्त बोलत आहे.           २६ जानेवारी २००० भारताचा प्रजासत्ताक दिन, भाऊ-बहिण कवायतीसाठी शाळेत गेले होते. सकाळी ८.३०-९.०० ची वेळ मी, आजी-आजोबा दूरदर्शनवर कवायतीचा कार्यक्रम पाहण्यात दंग होते. वडील स्नान करीत होते. आई स्वयंपाकघरात नाश्ता तयार करीत होती. मी नेहमीप्रमाणे भूक लागल्याचा शंख पुकारीत होतो. इतक्यात धडामधूम असा आवाज येऊ लागला. मला प्रथम चक्कर आल्याचा भास झाला. पण हळूहळू कपाट, खुर्च्या, दिवाण डगमगू लागले. स्वयंपाकघरातील भांडी खाली कोसळू लागली. आतबाहेर सगळीकडे किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. जमीन जोराने हलू लागली. हा तर भूकंप होता. आम्ही सर्वजण जीवाच्या आकांताने एकमेकांचा जीव वाचविण्यासाठी धडपडू लागलो. माझ्या आजीआजोबांना वाचविण्यासाठी मी त्यांच्याकडे...

अपंगाचे आत्मवृत्त - Apangache Atmavrutta

          शामभैय्या तुला एक सांगू? रागावणार नाही ना? माझा आधार घेत बाकावर बसत महेश नं विचारल? अरे सांग की, त्यात परवानगी कसली विचारतोस? अरे दोस्त आहे म्हटलं तुझा मी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हटले. शामभैय्या, आज तू तुझ्या बाबूजींवर चिडलास ना तसा पुन्हा कधी चिडू नकोस.           अरे महेश.... पण ... मी तावातावाने बोलायला लागणार तोच मला थांबवत एका हाताने महेशने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तो म्हणाला, शामभैय्या आज मी तुला माझी कहाणी सांगणार आहे. मी खूप लहान होतो. तेव्हा माझी आई देवाघरी गेली. माझे वडील मला जिवापाड जपायचे. पण मी फार हट्टी होतो. मी त्यांचं ऐकतच नसे. माझ्यासाठी ते स्वतःच्या हाताने माझ्या आवडीचं जेवण बनवायचे, मला आईची आठवण आली तर अंगाई म्हणायचे. पण एकदा मला ताप आला. बाबांनी माझ्यासाठी कितीतरी कष्ट केले. औषधपाणी केलं, रात्ररात्र जागरणं केली पण तो ताप माझ्या पायातली शक्तीच घेऊन गेला ठिकठिकाणचे दवाखाने केले, तीर्थक्षेत्री हिंडले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही ते नाहीच. जवळचे पैसे संपले. कष्ट करण्याची ताकद संपली शेवटी आज...

युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत - Yudhat Kami Alelya Sainikachya Patniche Manogat

          'युद्धस्य कथा रम्या' असे म्हणतात, ते खरेच ! पण कोणाला? ज्याचे जवळचे असे कोणी लढाईवर गेलेले असतील त्यालाच ? माझ्या दु:खावरची खपली अगदी ताजी आहे. कारगील युद्धात माझ्या पतीला वीरगती प्राप्त झाली.           उत्तर सीमेवर कारगिल क्षेत्रात शत्रूने छुपे युद्ध सुरू केले. घनघोर लढाई झाली. त्या युद्धात भारतीय सैन्याची सरशी झाली. सगळीकडे विजयोत्सव चालू असताना माझ्या व माझ्या छोट्या बाळाच्या जीवनात मात्र दाट अंधार पसरला कारण त्या लढाईत माझ्या बाळाच्या बाबांना वीरमरण लाभले होते. मी अभागिनी मात्र निराधार झाले. जरी वीरमरण आले तरी मला आज विधवेचे जिणे जगावे लागणार आहे. आपल्याकडे विधवेला समाजामध्ये काय मान असतो हे आपल्याला माहीत आहे. मग ती स्त्री सैनिकाची बायको असो अगर पोलिसाची बायको ती अखेर विधवाच तेव्हा लोक का विचार करत नाही. एखाद्याचा घरातील व्यक्तीचा मृत्यू युद्धात झाल्यानंतर जो काय मान मिळतो तो एकच दिवस तो मान असतो वीरपत्नी, वीरमाता पण मला माझा अभिमान आहे की माझा पती शत्रूला नामोहरण करता करता गेला. त्याला वीरमरण आले.    ...

सर्कशीतील हत्तीचे मनोगत - Sarkashitil Hattiche Manogat

          रसिक प्रेक्षकहो! तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटाने मला समजले तुम्ही माझ्या कामावर तुम्ही खुश झालात, मी केलेली गणरायाची पूजा, छोटया स्टुलावर एवढा मोठा देह मी सफाईदारपणे उभा केला. पुढचे पाय उभारून सोंडेने लवून मुजरा केला. लहान मुलांनी सोंडेत दिलेले पैसे शिताफीने माहुताकडे दिले. छोटया छोट्या मुलांच्या हातांनी वाजवलेल्या या त्यांनी आमच्याकडे उत्सुकतेने, कौतुकाने रोखलेले डोळे चेहऱ्यावरचा ओसंडणारा आनंद पाहून बरं वाटतं. पण मित्रांनो तुम्हांला आनंद वाटावा म्हणून मला किती यातना भोगाव्या लागतात याची कल्पना आहे का तुम्हांला ?           अगदी लहान होतो. आईच्या मागे मागे फिरत होतो. जंगलात सगळे आम्ही कळपात राहत होतो. मुक्तपणे फिरावे नदीचे थंडगार पाणी प्यावे. रानातील गवत खावे हे आमचे मुक्त जीवन आमचे हे दिवस किती सुखाचे चालले होते. अचानक शिकाऱ्याने आम्हाला खड्डा खणून त्यात पकडले, तर आमच्या काही बांधवांना नशेची गोळी देवून पकडले. मुक्या जीवाचा मुकाआक्रोश कोणाला समजणार ? पराधीनता आली वाट्याला आमची रवानगी झाली एका सर्कसवाल्याकडे सर्कसवाला मोठ...

कर्जबळी शेतकऱ्याचे आत्मवृत्त... - Karjbali Shetkaryache Atmavrutta

          आपला देश हा कृषिप्रधान देश आहे हे फक्त बोलण्यास आणि ऐकण्यासच छान वाटते. अहो, आज मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पूत्र आहे.' जय जवान जय किसान' चा नारा लावून जवान आणि किसान यांचे महत्त्व सारखेच आहे असे आपण सर्वजण मान्य करतो. कारण भारताच्या संरक्षणाची जबाबदारी सैनिकांवर असते; पण पोटाचे म्हणजे अप्रत्यक्षरित्या मानवी जीवनाचे संरक्षण आम्ही शेतकरी करतो. भारत देश हा जरी खेड्यांचा देश असला तरी येथील शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर सर्वांचेच जीवन अवलंबून आहे आणि शेती हा व्यवसाय आम्ही करत असून सुद्धा आम्हांला अजूनही आमच्या कामाची किंमत मिळत नाही.           कसेल त्याची जमीन असा कायदा झाला. याचा हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली, सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली, या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोचल्या आहेत का? याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? यामध्ये एकच होते ते म्हणजे श्रीमं...

एका क्रांतिकारकाचे मनोगत - Eka Krantikarkache Manogat

          इंग्रजांनी आमच्या मातृभूमीवर आक्रमण केले. आमच्याच देशात येऊन आम्हाला गुलामगिरी सोसायला लावली. हा विचार मला अस्वस्थ करीत होता. संपूर्ण देश देशप्रेमाने व्यापलेला, सत्याग्रह चळवळी, मोर्चे यांना नुसता ऊत आला होता. बाँब, पिस्तुले, लेखणी, चरखा व झाडू असली नानाविध आयुधे सामान्यांच्या हातात मिरविली जात होती. प्रत्येकाच्या पुढे एकच ध्येय होतं नि ते म्हणजे स्वातंत्र्य त्यासाठी प्राण पणाला लावून घरादारावर तुळशीपत्र ठेवले तेव्हा नाना पाटलांच्या माणसांनी नुसत्या सातारा जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या देशात धुमाकुळ सुरू केला. सरकारला सळो की पळो करून सोडले होते. राज्यकारभार करणे अवघड झाले होते. नाना पाटलांनी तेव्हा तासगावच्या सरकारी कचेरीवर तिरंगा ध्वज उभारला. अनुयायांनी त्यांची अनुकरणे केली मीही त्यात सामील होतो. अजुनही ते मंतरलेले दिवस आठवले तरी रक्त सळसळते.           खेड्यापाड्यांतल्या गरीब, निरपराध, लोकांसाठी प्रतिसरकार निर्माण केले होते. इंग्रज लोकांना धाक बसावा म्हणून त्या सरकारने स्वत:ची न्यायालये निर्माण केली होती. भूमिगतांचा ठाव...

मला पंख असते तर - Mala Pankha Aste Tar

          परीक्षेचा निकाल पहाण्यासाठी मी शाळेत गेले आणि मला समजले मी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहे. मला इतका आनंद झाला की केव्हा एकदा घरी पोचते व ही बातमी सर्वांना सांगते असे झाले आहे. त्याचक्षणी मनात विचार आला मला जर पंख असते तर किती बरे झाले असते. अशी उडत उडत गेले असते आणि ही आनंदाची बातमी सर्वत्र पोचवली असती.           मला पंख असते तर काय सुंदर कल्पना ! त्यावेळी मला देवाचाही खूप राग आला. काय बिघडले असते. त्याचे माणसाला त्याने पंख दिले असते, तर नाहीतरी बुद्धी, विचारशक्ती, वाचा इत्यादी अभिमान वाटावा अशा कितीतरी गोष्टी त्याने माणसाला दिल्याच आहेत. त्यात एका पंखांची भर पडली असती तर काय मजा आली असती नाही?           मला पंख असते तर किती गमती जमती केल्या असत्या मी, माझ्या जीवनात एक वेगळाच रंग भरला गेला असता अभ्यास करून कंटाळा आला तर उंच आकाशात गोल गोल फेऱ्या मारून पुन्हा खाली उतरले असते. या प्रदूषणापासून दूर जाऊन स्वच्छ मोकळ्या हवेत श्वासोच्छवास करून पुन्हा जोमाने अभ्यासाला बसले असते...

चित्रपट बंद झाले तर - Chitrapat Band Zale Tar

          परीक्षा चालू होती आणि उद्याच इंग्लिशचा पेपर होता. दूरदर्शनला गुढीपाडव्यानिमित्त एक गाजलेला चित्रपट लागला होता. मी अभ्यास करत होतो. घरातील सर्वजण चित्रपट पाहण्यात दंग होते. आई मात्र माझ्या छोट्या भावाचा अभयचा अभ्यास घेत होती. आईला घरातल्या सर्वाचा खूप राग आला होता. आईला वाटत होते घरातल्या माणसाने टि.व्ही. पाहू नये. ती मधून मधून टी.व्ही. बंद करायला सांगत होती. पण तिचे कोणीही ऐकत नव्हते. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले - खरोखर, हे चित्रपट बंद झाले तर किती बरे होईल !           पण चित्रपट बंद झाले तर माणसे आपला रिकामा वेळ कसा घालवणार ? पाऊस येत असेल तर दूरदर्शन चालू केले की, चित्रपट पाहता येतात. त्यामुळे मनोरंजन होते वेळही जातो. त्यामुळे माणसांना बरे वाटते. अनेकांच्या सहकार्यातून व परिश्रमातून एक चित्रपट तयार होतो. चित्रपट बंद केले तर अभिनेते, गायक, छायाचित्रकार, दिग्दर्शक अनेक तंत्रज्ञ तसेच अनेक सहाय्यक बेकार होतील. सध्याच्या बेकारीत फार मोठी भर पडेल.           आजकाल दूरचित्रवाणीवर अनेक वाहिन्य...

मला लॉटरी लागली तर - Mala Lottery Lagli Tar

          खरं तर लॉटरी लागून मिळणारा पैसा काही कष्टाचा नाही. हा सर्व खेळ दैवाचाच. एका भाजी विकणाऱ्या माणसाला तीन लाखाची लॉटरी लागल्याचे माझ्या ऐकण्यात आहे. काय गंमत आहे बघा. कालपर्यंत दोन आणि चार रूपये दराने भाजीची जुडी विकणारा आज लखपती झाला. काय बरं केलं असेल त्याने एवढ्या गलेलठ्ठ रकमेचं? त्याने काहीही केलं तरी मी काय करणार हे जाणून घ्यायला तुम्ही सारे उत्सुक असाल, तर सांगतो.           मला माझ्या जन्मगावाचे खूप आकर्षण आहे. या गावात अनेक गोष्टींचा अभाव आहे. त्यापैकी शिक्षण, आरोग्य व रस्ते या तीन गोष्टी मुख्य आहेत. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शाळेच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चार मैल पायी चालत जावून शिक्षण घ्यावे लागते. हे त्रासाचं व खर्चाचं देखील आहे. तेव्हा जर मला लॉटरी लागली तर त्यातील काही रक्कम माध्यमिक शाळा उघडण्यासाठी मी खर्च करणार आहे. तर त्यातूनच माझं कॉलेज उभारण्याचही ध्येय आहे. माझी अशी इच्छा आहे की, शिक्षणाची ज्योत घराघरांतून तेवल्याशिवाय अज्ञानाचा अंधार दूर होणार नाही. 'दुरितांचे तिमिर जावो' ही ज...

झाडे नसती तर - Zade Nasti Tar

          झाडे नसती तर.. छे! कल्पनाच करवत नाही. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि कण आपण अनुभवतो तो झाडांमुळेच आणि म्हणूनच त्याच्याबाबत ही कल्पनासुद्धा कृतघ्नपणाची वाटते.           झाडे ही निसर्गातील सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राहते निसर्गातील ऋतुचक्र हे केवळ झाडांवरच अवलंबून आहे. पर्जन्यवृष्टीचा महत्त्वाचा भाग म्हणजेच ही झाडे आहेत. झाडांमुळे वातावरणात थंडावा निमार्ण होतो कडुलिंबाच्या झाडाखाली सर्वसामान्य तापमानापेक्षा ५° से. तापमान कमी असते.           झाडांचे महत्त्व भारतीय संस्कृतीने हजारो वर्षापासूनच जाणले आहे. म्हणूनच भारतीय समाजात निसर्गपूजा हा महत्त्वाचा भाग मानला जातो. आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास हा झाडांच्या योगदानामुळेच आहे हे आपल्या पूर्वजानींही मान्य केले आहे. म्हणूनच तुळशीचे, वडाचे, पिंपळाचे पूजन ही त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. जंगलतोड करणे हा आता कायद्यानेही गुन्हा आहे. म्हणजेच संस्कृतीपासून कायद्यापर्यंत मानवाच्या प्रगल्भतेतही झाडांची ...

निसर्ग कोपतो तेव्हा - Nisarg Kopto Tevha

          निसर्ग परमेश्वरी लीलेचा एक सुंदर अविष्कार, सौंदर्याचा मूर्तिमंत साक्षात्कार, झाडे, पाने, फुले, पशुपक्षी, प्राणी, धरती, अन् आकाश या निसर्गाच्या साचातून सौदर्यांची बरसात होत असते. ऋतुनुसार बदलणारी निसर्गाची विविध रूपे जितकी सुंदर तितकीच उपयुक्त आणि आवश्यकही असतात. या मर्त्य जगात प्रत्येक गोष्ट नाशवंत असते. जो जन्माला आला त्याला मृत्यु ठरलेलाच. जुने निरूपयोगी झालेले नाहीसे झाल्याशिवाय नव्याने आगमन कसे होणार. निसर्ग मानवाच्या कल्याणासाठी हा समतोल राखत असतो. पण ज्या मानवाच्या कल्याणासाठी निसर्ग एवढा जीवाचा आटापीटा करत असतो त्या मानवानेच जर विनाशाचा मार्ग निवडला तर निसर्ग तरी काय करणार? मग तो देखील आपले रौद्र स्वरूप दाखवतो. प्रलयकार शंकराचा तृतीय नेत्रच जणू उघडलाय की काय असे वाटू लागते.           विज्ञानाच्या अतिरेकी मोहजाळ्यात फसून मानव जेव्हा नको तेवढी वृक्षतोड करू लागतो. तेव्हा त्याचा पावसावर परिणाम होतो. डोंगर उघडे बोडके होतात, जमिनीची झीज होते. अतिशय धूप झाल्याने डोंगराचे कडे कोसळू लागतात. धरती पाण्याविना शुष्क होवू ला...

जाहिरातीचे युग - Jahiratiche Yug

          जाहिरात .... हा आजच्या काळाचा जणू परवलीचा शब्द झाला आहे. दूरदर्शन असो, आकाशवाणी असो वा वृत्तपत्रे असोत. एवढेच नव्हे तर एखादा चांगला कार्यक्रम असो वा स्पर्धा असोत जाहिराती आपल्या सर्वत्र बस्तान ठोकूनच बसलेल्या दिसतात. कोणत्याही चांगल्या मालिके अगोदर या कार्यक्रमाचे प्रायोजक...... अशा अनंत जाहिराती पाहणे भाग पडते. रेडिओवरही कार्यक्रम चालू असतात. गाण्यांच्या अधेमधे ही जाहिराती ऐकाव्या लागतात. आपली इच्छा असो वा नसो जाहिराती शिवाय आपण दूरदर्शन, आकाशवाणीचे कार्यक्रम पाहू वा ऐकू शकत नाही हे सत्य आहे.           हल्ली तर जाहिराती, कंसाला जसा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कृष्ण दिसू लागला होता ना तथा जागोजागी दिसतात, एकही सार्वजनिक जागा या जाहिरातींच्या तडाख्यातून सुटलेली दिसत नाही. असं का? या प्रश्नचिन्हाला एकच उत्तर आहे, ते म्हणजे व्यापार व्यवसाय.           जाहिरात हे व्यापार करण्याचे, व्यवसायाच्या वाढीचे एक साधन झाले आहे. असे म्हटले जाते की उत्कृष्ट जाहिरातीमुळे निकृष्ट मालसुद्धा हा हा म्हणता खपतो....

हुंडा एक घातक प्रथा - Hunda ek Ghatak Pratha

          लग्नात हुंडा आणला नाही म्हणून सुनेला जाळले, हुंड्याची रक्कम पूर्णपणे दिली नाही म्हणून नवविवाहितेचा छळ, हुंडा दिला नाही म्हणून सासू व नवऱ्याच्या छळामुळे नवविवाहितेची आत्महत्या अशा एक ना दोन अनेक बातम्या वर्तमानपत्रातून वाचावयास मिळतात. खरंच आपण प्रगत अशा २१ व्या शतकाकडे चाललो आहोत की पुन्हा ५ व्या शतकाकडे चाललो आहोत याचा प्रश्न पडतो. आज समाजात केवळ हुंडा या अमानुष प्रथेमुळे स्त्रियांचा छळ होतो आणि नाहक बळी जात आहेत. "हाय अबला तेरी यही कहानी  आँचलमें दूध और आँखो में पानी"           पण असे का? पूर्वी मुलगी लहान असतानाच विवाह होत असे. सासरचे कुटुंब फार मोठे अशावेळी निदान आपल्या मुलीची नीट व्यवस्था व्हावी म्हणून गाय किंवा शेतीचा तुकडा भेट दिला जात असे ही भेट देण्याची सक्ती नसे. त्याच भेटीचे रूपांतर आता हुड्यांत झाले आहे. केवळ अशिक्षित अडाणी समाजात हुंडा घेतला जातो असे नाही पण सुशिक्षित वर्गातही हुंडा दिला जातो. तो उघडउघड दिला जात नसला तरी मुलाचे किंवा मुलीचे लग्न थाटात व्हावे हा आईवडिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. ए...

वर्तमानपत्राचे महत्त्व - Vartaman Patrache Mahatva

          सकाळचे वृत्तपत्र हे आमच्या घरी रोज वादाला कारण होते. कारण बाबा, ताई आणि मी अशा आम्हा तिघांनाही वृत्तपत्र वाचण्याची अति उत्सुकता असते. वर्तमानपत्राचे महत्व आज सुशिक्षित समाजात मान्य झालेले आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांच्याइतकीच दैनिक वृत्तपत्रे ही आता आवश्यक होऊन बसली आहेत. जर एखाद्या सुशिक्षित माणसाला एकांतवासात ठेवले तर, तो म्हणेल बाकी काही नको पण रोजची दैनिक तरी माझ्याकडे पाठवा.           कुतूहल हे मानवी स्वभावाचे एक खास वैशिष्ट्य आहे या जिज्ञासेपोटीच वर्तमानपत्राचा जन्म झाला. 'युद्धस्य वार्ता रम्या' असे म्हणतात. पण वर्तमान पत्रातील कोणत्याही बातम्या या वाचताना रम्य च भासतात. वर्तमानपत्र आपल्याला स्थानिक बातम्या तर देतेच. पण ते आपल्याला साऱ्या विश्वाच्याही बातम्या देते.           आज बातम्या पुरविण एवढेच काम वृत्तपत्राचे राहिलेले नाही. तर समाज मन घडविण्याचे कार्यही वृत्तपत्रे करत असतात. आपल्या देशाचा गेल्या दीडशे दोनशे वर्षाचा इतिहास पाहिला, तर या छोटया वृत्तपत्रांनी केवढी मोठी कामगिरी क...

माझ्या कल्पनेतील आदर्श शिक्षक - Mazya Kalpanetil Adarsh Shikshak

               गुरु-शिष्य ही परंपरा फार प्राचीन आहे. संतांनी गुरुमहिमा वर्णन केलेला आहे. तसेच उत्तम शिष्याची लक्षणे ही सांगितली आहेत. फक्त गुरु ज्ञानी असून चालत नाही. तर शिष्यदेखील ज्ञानलालसा असलेला हवा. शिक्षणामुळे मनुष्य जीवन सुखी व समृद्ध बनते. शिष्याला आदर्श, सर्वांगीण विकसित बनविण्याची किमया गुरूच करीत असतो. अनेक गुरु शिष्वांच्या आदर्श जोड्या प्रसिद्ध आहेत.               गुरुकृपा ज्याला लाभते त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नसते. पण त्यासाठी शिष्यानेदेखील गुरुच्या कसोटीला उतरले पाहिजे, ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्ती नाथांना आपले गुरु बनवले होते. त्यांच्याबद्दल त्याच्या मनात नितान्त आदर होता. तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथु ।           आपण जे काही आहोत ते आपल्या गुरुमुळेच, अशी ज्ञानदेवांची भावना होती. अन् माझ्या मते अशी भावना शिष्याची असायला हवी. एकलव्याच्या जीवनातही गुरुला अनन्यसाधारण महत्त्व होते. गुरुने विद्या देण्यास नकार दिल्यावर त्याने मातीच्या पुतळ्याच...

स्वावलंबन - Swavlamban

स्व. अवलंबन म्हणजेच स्वावलंबन,           स्वतःवर अवलंबून राहणे अर्थातच स्वतःची सर्व कामे स्वतःच करणे म्हणजेच खरे स्वावलंबन होय. स्वतःची लहानमोठी सर्व कामे आपली आपण केली पाहिजेत. कोणत्याही कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला. असे म्हटले जाते यातही स्वावलंबनाचे महत्त्व सांगितले आहे. दुसऱ्यावर विसंबून राहून जो स्वत: काही न करता स्वस्थ बसतो, त्याचे काम कधीच होत नाही. जो स्वतःच परिश्रम करतो त्याचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाते. अगदी लहानपणापासूनच ही सवय अंगी बाळगणे खूपच आवश्यक आहे.           आता हेच पहा ना स्वतःचे दप्तर, वह्या, पुस्तके, कपडे नीटनेटके जागच्या जागी .ठेवणे ह्या रोजच्या सवयींमध्ये म्हणजे सुद्धा स्वावलंबनच.           कालचीच गोष्ट, हस्त व्यवसायाच्या तासासाठी बाईंनी गुळगुळीत रंगीत कागद, कात्री आणि डिंक आणायला सांगितला होता. आईने सर्व वस्तू आणून दिल्या, पण मी मात्र, आई तूच माझ्या दप्तरात ठेव गं सगळं. असं म्हणून मोकळा झालो आणि खेळायला निघून गे...

नको तो रविवार - Nako To Ravivar

          वारात वार रविवार ! असं लोक का म्हणतात कोण जाणे? सुट्टीचा वार म्हणून भलेही कोणी स्तुती करो बापडे. मला तर सर्वांत नकोसा वाटणारा वार म्हणजे रविवारच ! नकोच वाटतो मला तो रविवार...           शनिवारीच शाळेतून मी ढीगभर गृहपाठ घेऊन येतो. साऱ्या   सरांना वाटतं आम्ही मोकाट असतो. मग अभ्यासाचं काय? आमच्या भवितव्याचं काय? प्रत्येक सर हे झालचं पाहिजे असा सारखा दमच देतात. पोर्शन संपत नाही या नावाखाली कोणी सर जादा तास रविवारीच घेतात.           शाळेचा अभ्यास आणि वर अवांतर परीक्षांचे वर्ग असतातच. ड्रॉइंग, गणित, प्रज्ञा, इंग्लिश ज्युनियर सारे क्लास रविवारी. तरी बरं, संस्कृत व हिंदीच्या परीक्षांना मी बसणार नाही असं मी घरी ठणकावून सांगितलं; नाहीतर रात्र शाळेत जावं लागलं असतं. मुलांची व्यक्तिमत्वं कशी सर्वांगांनी फुलली पाहिजेत या खुळचट कल्पनांनी सकाळ नाट्यवाचनस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, विज्ञान मेळावे (!) सारे भरतात एखाद्या रविवारीच गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळा या विवेकानंदांच्या उक्तीवरून स्फूर्ती घ...

वाचनाचे महत्त्व - Vachanache Mahatva

          ज्ञान प्राप्त करण्याची अनेक साधने आहेत, त्यापैकी वाचन हे ज्ञानसंपादनाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. मुद्रणकला भरभराटीस आल्यापासून हे ज्ञानसाधन अत्यंत सुगम झाले आहे. किंबहुना काही वेळा ज्ञान करून घेण्यास वाचनासारखे दुसरे कोणतेही साधन उपयोगी पडतच नाही. वाचाल तर वाचाल हे डॉ. आंबेडकरांचे सुवचन किती सार्थ आहे याची आपल्याला जाणीव होते. वाचनाने आपण बहुश्रुत होतो..           भूतकाळाशी वर्तमानाची सांगड घालण्याचे सामर्थ्य ग्रंथामध्ये असते. पण त्यासाठी हे ग्रंथ वाचणे अत्यंत आवश्यक असते. शाळा, महाविद्यालये यांच्याबाहेरही ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानसंपादन करता येते. हे ज्ञानसंपादन प्रत्येकाने केले पाहिजे. आपल्या व्यवसाया बाहरेच्या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान हे आपल्याला असायला हवे. वाचनामुळे आपण आपले ज्ञान अद्यावत ठेवू शकतो अशा या अद्यावत ज्ञानप्राप्तीसाठी वाचनासारखा दुसरा मार्ग नाही. मानवाच्या प्रगतीचा मार्ग वाचनामुळे सुकर होतो.           कोणत्याही विद्वानाला कोणत्याही विषयावरील आपले विचार सर्व ठिकाणी स्वत:...

विज्ञान शाप की वरदान - Vigyan Shap Ki Vardan

     मानवाने आपल्या बुद्धीच्या व कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या हजारोवर्षापूर्वीचा रानटी माणूस आज सभ्य नि सुसंस्कृत बनला आहे. मानवाच्या या भरमसाठ प्रगतीचे श्रेय विज्ञानालाच द्यावे लागेल. विज्ञानाची पहाट झाली नि मानवाच्या जीवनातील अज्ञान-अंधकार निवळत गेला.           विज्ञानाने जगाला जे दिलं त्याकडे दृष्टीक्षेप टाकला की, काही न विसरले जाणारे प्रसंग आठवतात. दुसऱ्या महायुद्धात विज्ञानजनित शास्त्रज्ञांनी जो अमानुष नरसंहार केला तो विसरता येईल का? जपानची दोन मोठी शहरं हिरोशिमा व नागासाकी भयंकर बॉम्बवर्षावाल जळून खाक झाली. तिथलं जीवनच जणू होरपळून निघालं सजीव, निर्जिव सारे धुळीत मिळाले. आगीचा हा भयंकर भस्मासूर विज्ञानाची देणगी होती ना? अशा या संहारक शक्तीला वरदान कसे मानावे?           विज्ञानामुळे राष्ट्रा-राष्ट्रात सत्ता स्पर्धा सुरू झाली. माणसाचे जीवन कवडीमोलाचे वाटू लागले. यंत्राच्या प्रचंड शक्तीपुढे मानव छोटा वाटू गला. वेगवेगळ्या विस्फोटांमुळे, रासायनिक प्रक्रियांमुळे, वाहनांच्या वर्दळीमु...

महागाईचा भस्मासूर - Mahagai cha Bhasmasur

    सगळ्या जगाचं भस्म करून टाकायला टपलेली ही महागाई शंकराच्या शापान उन्मत्त झालेल्या भस्मासुरासारखीच ज्याच्या त्याच्या मागे हात धुऊन लागलीय की काय असे वाटू लागलंय.           दैनंदिन गरजेच्या वस्तू घ्या किंवा इतर वस्तू घ्या ज्या त्या वस्तूवर या महागाईनं आपला वरदहस्त ठेवलेलाच आहे. सामान्य माणसाचं तर जीणंच मुश्कील झाले आहे.           धान्य, किराणा, भाजीपाला, कपडालत्ता या दैनंदिन गरजेच्या वस्तू घ्यायच्या म्हटल्या तरी सर्वसामान्यांना मोठा प्रश्न भेडसावतो, दूध, तेल तूप यांच्याबद्दल तर काही बोलूच नका. ही महागाई केवळ खाद्यवस्तूंपुरतीच मर्यादित नाही. पेट्रोल, डिझेल, विजेवर चालणारी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू या साऱ्यांना आपल्या मुठीत ठेवले आहे परिणाम काय तर एक दुष्टचक्र माणसाच्या जीवनाला ग्रासून उरले आहे.           महागाई झाली की महागाई भत्ता वाढतो आणि भत्ता वाढला की पुन्हा वस्तूंच्या किमती वाढतात याला आणखी कारण म्हणजे साठेबाजी काळाबाजार इ. होय. त्यातच भेसळीची भर पडते. वेळप्रसंगी जीवालाही अपाय होऊ ...

थांबला तो संपला ! - Thambala To Sampla

          गतिमान जीवनात गती हवीच. गतीविना प्रगती नाही. कालचक्र एकसारखे पुढे पुढे जात आहे. त्याच्याबरोबर धावलात तर प्रगती पथावर पोहोचाल. या जगात काळाची पावले ओळखायला शिकलात तरच तुमचा निभाव लागेल. इंग्रजांजवळ काळाची पावले ओळखण्याची कला होती. म्हणून तर ते दीडशे वर्षे भारतावर राज्य करू शकले.           जीवन म्हणजे पाणी, अन् पाणी म्हणजे जीवन, जीवन अन् पाणी दोन्हीत साम्य आहे. दोन्हीही प्रवाही नदी धावत असते म्हणूनच लोकांची जीवने फुलत असतात. सागराशी मिलन हेच तिचे ध्येय साकार होते. पाण्याचा प्रवाह थांबला तर त्याचे डबके होते, पण तेच वाहू लागले. तर उपयोगी पडते. त्याचप्रमाणे मानवी जीवनाबाबतही हा नियम लागू आहे. जो थांबतो तो संपतो. सतत ध्येय पथावर घावत राहिले तरच मानवी जीवनाचे सार्थक होईल. स्थिरता म्हणजे मृत्यूच. चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी.           जीवनात अनेक संकटे येतात. अनेक अडथळे येतात म्हणून थांबून कसे चालेल? नदी ज्याप्रमाणे अडथळे आल्यावर आपला प्रवाह बदलते त्याप्रमाणे संकटापासून दूर न होता त्य...

आजचा विद्यार्थी - Aajcha Vidyarthi

          आजचा विद्यार्थी म्हटलं की, तो कालच्यापेक्षा वेगळा असणारच ! कारण कालच्या अनुभवाच्या परिस्थितीचा प्रभाव आजवर पडतो आणि म्हणूनच कालच्यापेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या हा नेहमीच प्रगल्भ आणि प्रगतीशील असतो यात शंका नाही. ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यालाच लागू पडते मग ती एक व्यक्ती असो किंवा पिढी !           आजचा विद्यार्थी ही एक नवी पिढी आहे. विद्यार्थी हे सर्वगुणसंपन्न असावेत. त्यांनी काही तरी चांगले करून नावलौकीक मिळवावा असे सर्वानाच वाटत असते. विद्यार्थीदशा ही मानवाच्या जीवनात एकदाच येते. या अवस्थेमध्ये तुमच्या जीवनाचा मार्ग निश्चित केला जातो. जीवनाला नवी दिशा, नवे वळण मिळते. या विद्यार्थीदशेमध्ये काही तरी चांगले मिळविण्याचा, कर्तृत्व सिद्ध करण्याचा, आपली वेगळी वाट चोखाळण्याचा उत्साह भरलेला असतो. पण उगीच वेळ वाया घालवू नका. हे वय आहे प्रगतीचे पुढे जाण्याचे आणि आकाशात भरारी घेण्याचे, नाही हे वय मुलांनी कट्टयावर बसण्याचे आणि प्रवेशद्वारी उभे राहण्याचे.           कालच्या पिढीला आजचा विद्यार्थ...