निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

थांबला तो संपला ! - Thambala To Sampla

        गतिमान जीवनात गती हवीच. गतीविना प्रगती नाही. कालचक्र एकसारखे पुढे पुढे जात आहे. त्याच्याबरोबर धावलात तर प्रगती पथावर पोहोचाल. या जगात काळाची पावले ओळखायला शिकलात तरच तुमचा निभाव लागेल. इंग्रजांजवळ काळाची पावले ओळखण्याची कला होती. म्हणून तर ते दीडशे वर्षे भारतावर राज्य करू शकले.

        जीवन म्हणजे पाणी, अन् पाणी म्हणजे जीवन, जीवन अन् पाणी दोन्हीत साम्य आहे. दोन्हीही प्रवाही नदी धावत असते म्हणूनच लोकांची जीवने फुलत असतात. सागराशी मिलन हेच तिचे ध्येय साकार होते. पाण्याचा प्रवाह थांबला तर त्याचे डबके होते, पण तेच वाहू लागले. तर उपयोगी पडते. त्याचप्रमाणे मानवी जीवनाबाबतही हा नियम लागू आहे. जो थांबतो तो संपतो. सतत ध्येय पथावर घावत राहिले तरच मानवी जीवनाचे सार्थक होईल. स्थिरता म्हणजे मृत्यूच.

चलना जीवन की कहानी,
रुकना मौत की निशानी.

        जीवनात अनेक संकटे येतात. अनेक अडथळे येतात म्हणून थांबून कसे चालेल? नदी ज्याप्रमाणे अडथळे आल्यावर आपला प्रवाह बदलते त्याप्रमाणे संकटापासून दूर न होता त्याला सामोरे जा. तरच तुमचे ध्येय सफल होईल. आमच्यापुढे धोरांचा जाज्वल्य इतिहास, आदर्श म्हणून उभा आहे. तो आदर्श मनापासूनच जोपासला पाहिजे.

        जगात दुर्मिळ गोष्टीमध्ये काळाची गणना होते. सुटलेला बाण, गेलेला शब्द अन् घालवलेला काळ पुन्हा परत येत नाही. म्हणूनच काळाबरोबर धावलं पाहिजे. पुष्कळदा माणसे आपला वेळ गप्पा मारण्यात घालवतात नंतर मात्र पश्चात्ताप होऊ लागतो. पण आता काही उपयोग नसतो. कारण काळ परत येत नाही. कालचक्र उलटे फिरवता येत नाही.

सारखा काळ चालला पुढे
कुणाचे कोणावाचून अडे ।

कालचक्र हे अविरत फिरते त्याच्याबरोबर धावायचे म्हणजे जागरूक, गतिशील असायला हवे. अन्यथा ८४ लक्ष योनीनंतर मिळालेला हा दुर्लभ नरदेह फुकट जाईल. तेव्हा आपले जीवन सार्थकी लावायचे असेल तर थांबू नका, पुढे चला, पुढे चालत रहा, नक्की ध्येय शिखरावर जाऊन पोहोचाल. आळस झटकला पाहिजे. फक्त मनोरथांनी काम भागणार नाही. तर त्याला उदयमशीलतेची तोड हवी. उदयमशीलता म्हणजेच यशाची नांदी। सुखी समृद्ध यशस्वी जीवनासाठी थांबू नका. इशारा म्हणून लक्षात ठेवा.

थांबला तो संपला।

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या