निबंध कसा असावा ? How essays should be?

        निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.

        निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.

        निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.

        निबंधाच्या पुस्तकात काही निबंधात ओळींचे बंधन पाळलेले नाही पण ते विचार लिहिण्याची सवय व्हावी म्हणून ! हेच लिहा असं नाही पण यासारखे किंबहुना याहीपेक्षा चांगल, स्वतःच काहीतरी लिहा. शिवाय हे निबंध वाचताना पाहताना छोटे दिसतील पण स्वतःच्या मनाने लिहिताना उत्तरपत्रिकेचे एक ते दीड पान होते.

निबंध लिहताना एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे ते म्हणजे काय लिहता यापेक्षा कसं लिहिता यावर निबंधाचा दर्जा ठरतो.

  • महत्त्वाच्या सूचना:

प्रथम निबंधाचा विषय व मुद्दे नीट वाचा. मुद्दे मनात घोळा. मुद्द्यांची सुसंगती लक्षात घ्या.
पहिल्या ओळीच्या मध्यभागी निबंधाचे नाव लिहा. उत्तर पत्रिकेत मुद्दे लिहू नका.
निबंधाची सुरूवात आकर्षक असावी.
मुद्द्यांचा योग्य प्रमाणात विस्तार करा. मुद्द्यांना अनुसरून परिच्छेदाची रचना करा. विचारांची मांडणी व रचना सुसंगत करा.
निबंधाचा समर्पक शेवट करा.
प्रत्येक नवीन परिच्छेद सुरू करताना सुरूवातीला योग्य तेवढी जागा सोडा. हस्ताक्षर सुवाच्च व सुंदर काढा. शुद्ध लिहा. आवश्यक तेथे विरामचिन्हे वापरा.
निबंध लिहून झाल्यावर तो पुन्हा वाचा काही उणिवा राहिल्यास त्या दूर करा.
खाडोखाड करू नका

  • निबंधाची पूर्वतयारी :
- पुस्तके व मासिके यांतून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी भाषाविषयक व मराठी साहित्यविषयक मजकुरांचे वाचन करा.
 वर्तमानपत्र दररोज व नियमित वाचा.
वाचलेल्या मजकुरांचे मनन व चिंतन करा. कठीण मजकूर शिक्षकांकडून किंवा वडिलधाच्या व्यक्तिंकडून समजून घ्या.
आजूबाजूला घडणाऱ्या विशेष घटनांचे, प्रवासात निसर्गातील सुंदर दृश्यांचे स्वतःच्या भाषेत टिपण करा.
थोरामोठ्यांच्या विचारांतील सुंदर वाक्यांचा, परिच्छेदांचा संग्रह करा.
विविध विषयांवर सुसंगतरित्या कमीत कमी दहा ओळींचा निबंधलेखनाचा सराव करा.

  •  निबंधाचे मुख्य प्रकार:

निबंधाच्या स्वरूपावरून निबंधाचे पुढील प्रकार होतात.
१. वर्णनात्मक निबंध
२. विवेचनात्मक निबंध
३. कल्पनात्मक निबंध
४. चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक निबंध

         आता आपण प्रत्येक निबंध प्रकारावर स्वतंत्रपणे विचार करू या.

१) वर्णनात्मक निबंध

विषय वादविवादासारखा असेल तर दोन पक्ष स्वतंत्र मांडावे, प्रथम एका पक्षाने केलेला विरोध व नंतर दुसऱ्या पक्षाने केलेले विरोधाचे खंडन.
भाषा सोपी, साधी व आकर्षक असावी.

 २) विवेचनात्मक निबंध

विवेचनात्मक निबंध लिहिताना -
विषयाला अनुसरून प्रस्तावना असावी.
विषय वादविवादासारखा असेल तर दोन पक्ष स्वतंत्र माडांवे, प्रथम एका पक्षाने केलेला विरोध व नंतर दुसऱ्या पक्षाने केलेले विरोधाचे खंडन.
भाषा सोपी, साधी व आकर्षक असावी.

 ३) कल्पनात्मक निबंध -

कल्पनात्मक निबंध लिहिताना
निबंध लेखकाने कल्पनेला पोषक अशी प्रस्तावना करावी.
कल्पनेच्या भरार्या अवश्य माराव्या पण त्या अवास्तव असू
भाषा अलंकारिक, वाक्प्रचारानी युक्त असावी.
विषयाच्या मर्यादा लक्षात घेवून विस्तार करावा, शेवट हा मोहक व प्रभावी असावा.

४) आत्मकथनात्मक निबंध -

आत्मकथनात्मक निबंध लिहिताना -
या निबंधातील संपूर्ण निवेदन प्रथमरूपी एकवचनात असावे. संपूर्ण निबंध 'मी' या सर्वनामाने कथन केलेला असावा. 'तो' सर्वनामाचा प्रयोग करू नये. आत्मकथन करताना आताची स्थिती कशी आहे ते सांगून जन्माकडे, किंवा पूर्वीच्या स्थितीकडे वळावे.
आजची स्थिती कशी प्राप्त झाली, त्यातील सुखदुःखाच्या आठवणी सांगाव्यात. आज प्राप्त झालेल्या स्थितीबद्दल काय वाटते? सुख, दुःख वा समाधान ?
भाषा कल्पनांनी युक्त, सोपी सरळ व आकर्षक असावी.
 
चरित्रात्मक निबंध -
चरित्रात्मक निबंध लिहिताना -
व्यक्त्ती वैशिष्ट्ये सांगणारा एखादा प्रसंग किंवा वाक्य घेवून सुरुवात करावी.
व्यक्तिचा जन्म, बालपण इ. विषयी सुरुवातीलाच लिहावे.
व्यक्तिच्या जीवनातील महत्त्वाची कार्ये क्रमाने लिहावीत.
काल्पनिक प्रसंग टाळावे, वास्तव तेच लिहावे.

टिप्पण्या