चला बरे झाले, सर्वजण आपापल्या कामात गुंतलेत नाहीतर जो तो येतो आणि पोपटा राम राम म्हण पोपटा मिठू मिठू बोल असे म्हणून मला हैराण करतात. मला या घरातील हा लहान मुलगा फार आवडतो. तो एकटक माझ्याकडे बघत राहतो. मध्येच हसतो, टाळ्या वाजवतो. त्याच्याकडे पाहातच मी हे कारावासाचं लाजिरवाणं जीवन कसं तरी गोड करून घेतो. लाजिरवाणं नाहीतर काय? इथे काही देशभक्तीच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे ही कैद मिळालेली नाही की अभिमान वाटावा. अर्थात गुन्हेगारीची खंतही नाही. केवळ माणसाच्या प्राण्यांवरील पक्ष्यांवरील प्रेमाचाच हा प्रसाद आहे. काय? पण गंमत काय आहे नाव द्यायचं भूत दया आणि परिणाम कारावास.
'आज मी या पिंजऱ्यात एकटा, एकाकी जीवन जगतो आहे. दिलं ते ते खातो आहे, पाजलं ते पितो आहे. या सान्यांच्या दृष्टीने मी एक खेळण बनलो आहे. असा एकान्त लाभला की, मला माझे बालपण आठवते. मी मनसोक्त विहार करत होतो. बाहेरच्या जगात, रानावनात फिरत होतो. आवडेल ती फळे झाडावर बसून खात होतो. पिंजऱ्यात अडकल्यामुळे मी बाहेरच्या हवेत फिरू शकत नाही.
माझ्या आईच्या उबदार पंखाच्या सावलीत मी पहुडलो होतो. बाजूलाच माझी बहीण पण होती. जगातील सर्व सुख जणू आमच्या घरट्यात येवून सामावले होते. आणि एक हात सरसावला. त्याच्या हातात जाड कापड होते. त्याने झडप घातली आणि प्रथम माझी आई आमच्यापासून दूर झाली. तिचा केविलवाणा आक्रोश आजही माझ्या कानात घुमतो आहे. माणसाबद्दल माझ्या मनात जी देवषाची ज्वाळा भडकली ती या आक्रोशातूनच मग मला बाहेर ओवून काढले. बहुतेक माझ्या मागोमाग बहिणीचीही तीच दशा झाली असावी. तो हात एका पक्षी विकणान्या माणसाचा होता. माझासारखेच इतर पक्ष्यांना भविष्य सांगणारी भोंदू लोक पिंजऱ्यात बंद करून ठेवतात व चिठ्ठया उचलण्यासाठी भविष्य सांगण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. स्वत:चा संसार सुखात रहावा म्हणून दुसऱ्यांच्या संसाराची होळी करण्याचा मानवी नियम आमच्यासारख्या अबोल पक्ष्याची काय तमा बाळगणार?
आज मी या घरात गेली दोन वर्ष मेलेलं जीवन जगत आहे. मेलेलंच म्हटलं पाहिजे. कारण तेथे काडीमात्र स्वातंत्र्य नाही. एरवी या झाडावरून त्या झाडावर मुक्तपणे विहार करावा. हवे ते फळ चालावे, अर्धवट चाखून सोडून द्यावे, झऱ्याचं आणि नदीचं निर्मळ जल प्यावं. विहग खग ही नावे येथे व्यर्थ ठरली आहेत. वरून उपकाराची भाषा. पण त्यांना कोणी सांगावं. सोन्याचा असो वा चांदीचा पिंजरा शेवटी पिंजराच खूप आठवतं आमच्या जातीय स्वैर मुक्त जीवन, पण येथे सांगांव कुणाला? वेदना समजल्या असत्या तर पिंजऱ्यात कोंडलं असतं का? ठेविले अनंते तैसेचि रहावे ह्या संत उक्तीशिवाय कोण बरे सांत्वन देणार?
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या