निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

स्वावलंबन - Swavlamban


स्व. अवलंबन म्हणजेच स्वावलंबन,

        स्वतःवर अवलंबून राहणे अर्थातच स्वतःची सर्व कामे स्वतःच करणे म्हणजेच खरे स्वावलंबन होय. स्वतःची लहानमोठी सर्व कामे आपली आपण केली पाहिजेत. कोणत्याही कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला. असे म्हटले जाते यातही स्वावलंबनाचे महत्त्व सांगितले आहे. दुसऱ्यावर विसंबून राहून जो स्वत: काही न करता स्वस्थ बसतो, त्याचे काम कधीच होत नाही. जो स्वतःच परिश्रम करतो त्याचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाते. अगदी लहानपणापासूनच ही सवय अंगी बाळगणे खूपच आवश्यक आहे.

        आता हेच पहा ना स्वतःचे दप्तर, वह्या, पुस्तके, कपडे नीटनेटके जागच्या जागी .ठेवणे ह्या रोजच्या सवयींमध्ये म्हणजे सुद्धा स्वावलंबनच.

        कालचीच गोष्ट, हस्त व्यवसायाच्या तासासाठी बाईंनी गुळगुळीत रंगीत कागद, कात्री आणि डिंक आणायला सांगितला होता. आईने सर्व वस्तू आणून दिल्या, पण मी मात्र, आई तूच माझ्या दप्तरात ठेव गं सगळं. असं म्हणून मोकळा झालो आणि खेळायला निघून गेलो. आईचं पुढचं बोलणं ऐकलच नाही.. शाळा सकाळची होती. नेहमीप्रमाणे उठलो स्वत:चं आवरलं आणि ७ वाजता शाळेत गेलो. हस्त व्यवसायाचा तास आला आणि मी कागद, कात्री, शोधू लागलो पण दप्तरात त्यापैकी काहीच नव्हतं. बाईंनी तासभर वर्गात उभं केलं. त्याचक्षणी ठरवून टाकलं की असा आळस पुन्हा करायचा नाही. आपलं काम आपणच करायचं माझ्या वागणुकी तला हा बदल पाहून आई गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, जय स्वावलंबन मी ही तिच्या सुरात सूर मिसळला, होच मुळी, जय स्वावलंबन कारण स्वावलंबनाचे महत्त्व मला पटले होते.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या