निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

वाचनाचे महत्त्व - Vachanache Mahatva

        ज्ञान प्राप्त करण्याची अनेक साधने आहेत, त्यापैकी वाचन हे ज्ञानसंपादनाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. मुद्रणकला भरभराटीस आल्यापासून हे ज्ञानसाधन अत्यंत सुगम झाले आहे. किंबहुना काही वेळा ज्ञान करून घेण्यास वाचनासारखे दुसरे कोणतेही साधन उपयोगी पडतच नाही. वाचाल तर वाचाल हे डॉ. आंबेडकरांचे सुवचन किती सार्थ आहे याची आपल्याला जाणीव होते. वाचनाने आपण बहुश्रुत होतो..

        भूतकाळाशी वर्तमानाची सांगड घालण्याचे सामर्थ्य ग्रंथामध्ये असते. पण त्यासाठी हे ग्रंथ वाचणे अत्यंत आवश्यक असते. शाळा, महाविद्यालये यांच्याबाहेरही ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानसंपादन करता येते. हे ज्ञानसंपादन प्रत्येकाने केले पाहिजे. आपल्या व्यवसाया बाहरेच्या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान हे आपल्याला असायला हवे. वाचनामुळे आपण आपले ज्ञान अद्यावत ठेवू शकतो अशा या अद्यावत ज्ञानप्राप्तीसाठी वाचनासारखा दुसरा मार्ग नाही. मानवाच्या प्रगतीचा मार्ग वाचनामुळे सुकर होतो.

        कोणत्याही विद्वानाला कोणत्याही विषयावरील आपले विचार सर्व ठिकाणी स्वत: हजर राहून स्वमुखाने सांगता येणे शक्य नाही. पण तेच त्याने लिहून काढले व पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले, तर त्याच्यापासून पाहिजे त्याला फायदा करून घेता येतो. विद्वान माणसे आपले विचार लिहून ठेवतात म्हणून महाभारत व रामायण यापासून लोकांना आज हजार वर्षे ज्ञान व करमणूक होत आहे. वाचनाच्या छंदामुळे माणसाचे व्यक्तिमत्वही संपन्न होते, ज्या व्यक्तिचे वाचन भरपूर असते. त्याचे भाषण श्रवणीय ठरते. कथा, कांदबऱ्या नाटके काव्य यांच्या वाचनाने मनोरंजन होतेच शिवाय मनाला फार मोठी प्रसन्नता व प्रगल्भता लाभते. थोर संतांच्या, समाजसुधारकांच्या गोष्टी वाचल्याने त्यांच्याप्रमाणे आपणही लोकांच्या उपयोगी पडावे असे वाटते. रामायण, महाभारत वाचून आपण नीतिमान, सद्गुणी व धीट बनतो. चांगली चांगली पुस्तके व वर्तमानपत्रे नित्य वाचत असल्याने ज्ञानाची एकसारखी वृद्धी होत असते व त्याचा व्यवहारात उपयोग होत असतो. थोरांची चरित्रे, आत्मचरित्रे ही जनसामान्यांना स्फूर्तिदायक ठरतात. आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणींतून पार पाडण्यात वाचनापासून साहाय्य होते. जगात प्रतिवर्षी नवीन कल्पना, जुने शोध व जुन्या युक्त्या एकापाठीमागून एक मागे पडत आहेत. जे शाळेत किंवा विद्यालयात संपादलेल्या ज्ञानासच चिकटून राहतात व व्यवहारात पडल्यावर वाचनाची सवय ठेवत नाहीत. त्यांना आपल्या जुनेपणाबद्दल उपहास करून घ्यावा लागतो. शिक्षक, वैद्य, कारागीर, नोकर यापैकी ज्यांनी वाचनाची सवय ठेवलेली नसते त्यांना त्यांच्या धंद्यात झालेल्या सुधारणा न कळल्यापासून होणारे नुकसान सोसावे लागते. इतकेच नाही तर त्यांचा संबंध ज्या तरूण लोकांशी होतो त्यात त्यांची थट्टा होऊ लागते.

        वाचनामुळे माणूस चिंतनशील बनतो. आजकाल दूरदर्शनचा प्रसार विलक्षण झपाट्याने झाला आहे आणि त्यामुळे माणसांची वाचनाची सवय खूपच कमी झाली आहे. दूरदर्शनवरचे कार्यक्रम माणूस एकापाठोपाठ एक पाहतो आणि विसरून जातो. याउलट एखादे चांगले पुस्तक वाचले तर भाषा सुधारते, शब्दज्ञान वाढते मनाला एक प्रकराचा आनंद वाटतो. अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनात वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या