निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

निसर्ग कोपतो तेव्हा - Nisarg Kopto Tevha

        निसर्ग परमेश्वरी लीलेचा एक सुंदर अविष्कार, सौंदर्याचा मूर्तिमंत साक्षात्कार, झाडे, पाने, फुले, पशुपक्षी, प्राणी, धरती, अन् आकाश या निसर्गाच्या साचातून सौदर्यांची बरसात होत असते. ऋतुनुसार बदलणारी निसर्गाची विविध रूपे जितकी सुंदर तितकीच उपयुक्त आणि आवश्यकही असतात. या मर्त्य जगात प्रत्येक गोष्ट नाशवंत असते. जो जन्माला आला त्याला मृत्यु ठरलेलाच. जुने निरूपयोगी झालेले नाहीसे झाल्याशिवाय नव्याने आगमन कसे होणार. निसर्ग मानवाच्या कल्याणासाठी हा समतोल राखत असतो. पण ज्या मानवाच्या कल्याणासाठी निसर्ग एवढा जीवाचा आटापीटा करत असतो त्या मानवानेच जर विनाशाचा मार्ग निवडला तर निसर्ग तरी काय करणार? मग तो देखील आपले रौद्र स्वरूप दाखवतो. प्रलयकार शंकराचा तृतीय नेत्रच जणू उघडलाय की काय असे वाटू लागते.

        विज्ञानाच्या अतिरेकी मोहजाळ्यात फसून मानव जेव्हा नको तेवढी वृक्षतोड करू लागतो. तेव्हा त्याचा पावसावर परिणाम होतो. डोंगर उघडे बोडके होतात, जमिनीची झीज होते. अतिशय धूप झाल्याने डोंगराचे कडे कोसळू लागतात. धरती पाण्याविना शुष्क होवू लागते, तिच्यातील सत्व नाहीसे होवू लागतात. सचेतनाला अचेतनाची कळा येते. त्यातच भर म्हणून की काय शहरीकरणामुळे, यांत्रिकीकरणामुळे प्रदूषण वाढते. प्रदूषणाचा परिणाम म्हणजे रोगराई वाढते, माणसाचे जीवन जगणे घातक होते आणि यात साऱ्या माणसाचे माणूसपण जळून खाक होते. माणूस स्वार्थी होतो.

        निसर्गाचा प्रत्यक्ष प्रकोप म्हणून आपल्याला दिसते, कुठे जलप्रलयाचे तांडव तर कुठे दुष्काळाने गिळंकृत केलेले महाभयानक रूप, कुठे लागलेल्या असतात मोठमोठ्या आगी तर कुठे होत असतात भयानक भूकंप, कुठे ज्वालामुखी जागृत होऊन त्यातील तप्त लाव्हारसात शहरेच्या शहरे नष्ट होतात तर.... असे किती म्हणून सांगावे. या सान्याचा शेवट एकच मानवजातीचा सगळ्या सृष्टीचा विनाश, निसर्गाचा हा कोप थांबवायचा असेल तर त्याला उपाय एकच पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गाचे रक्षण, चला तर मग पुन्हा निसर्गाकडे.

हिरव्यागार वनश्रीसाठी
भूमाता समृध्दीसाठी
ग्रंथ सृष्टीचा उघडा
वाजे प्रगतीचा चौघडा ॥

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या