निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

महागाईचा भस्मासूर - Mahagai cha Bhasmasur

    सगळ्या जगाचं भस्म करून टाकायला टपलेली ही महागाई शंकराच्या शापान उन्मत्त झालेल्या भस्मासुरासारखीच ज्याच्या त्याच्या मागे हात धुऊन लागलीय की काय असे वाटू लागलंय.

        दैनंदिन गरजेच्या वस्तू घ्या किंवा इतर वस्तू घ्या ज्या त्या वस्तूवर या महागाईनं आपला वरदहस्त ठेवलेलाच आहे. सामान्य माणसाचं तर जीणंच मुश्कील झाले आहे.

        धान्य, किराणा, भाजीपाला, कपडालत्ता या दैनंदिन गरजेच्या वस्तू घ्यायच्या म्हटल्या तरी सर्वसामान्यांना मोठा प्रश्न भेडसावतो, दूध, तेल तूप यांच्याबद्दल तर काही बोलूच नका. ही महागाई केवळ खाद्यवस्तूंपुरतीच मर्यादित नाही. पेट्रोल, डिझेल, विजेवर चालणारी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू या साऱ्यांना आपल्या मुठीत ठेवले आहे परिणाम काय तर एक दुष्टचक्र माणसाच्या जीवनाला ग्रासून उरले आहे.

        महागाई झाली की महागाई भत्ता वाढतो आणि भत्ता वाढला की पुन्हा वस्तूंच्या किमती वाढतात याला आणखी कारण म्हणजे साठेबाजी काळाबाजार इ. होय. त्यातच भेसळीची भर पडते. वेळप्रसंगी जीवालाही अपाय होऊ शकतो.

        शासन अनेक प्रकारचे उपाय महागाई रोखण्यासाठी करीत आहे. त्याला सर्वांनी मदत केली पाहिजे. अधिक काम करून उत्पादन वाढवता येईल, उत्पादन वाढले की किंमतीवर नियंत्रण येईल, काळाबाजार, साठेवाजी यांना आळा बसेल. मानवाच्या दैनंदिन गरजा योग्य प्रकारे भागू लागल्या की मानवाचे आरोग्य चांगले राहील. देश समृद्ध होईल. सकस आहार स्वास्थ्य यामुळे पुढची पिढी अधिक आरोग्यपूर्ण जीवन जगू शकेल.

        यासाठीच प्रथम महागाई निर्मूलनाच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाने आपआपल्या कुवतीनुसार महागाई दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, व्यापान्यांनी काळाबाजार, भेसळ करणे, नागरिकांनी अवास्तव साठा करणे टाळले पाहिजे. सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे, तरच महागाई नष्ट होऊ शकेल व महागाईच्या भस्मासूरापासून आपली सुटका होऊ शकेल. 

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या