निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

अपंगाचे आत्मवृत्त - Apangache Atmavrutta

        शामभैय्या तुला एक सांगू? रागावणार नाही ना? माझा आधार घेत बाकावर बसत महेश नं विचारल? अरे सांग की, त्यात परवानगी कसली विचारतोस? अरे दोस्त आहे म्हटलं तुझा मी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हटले.

शामभैय्या, आज तू तुझ्या बाबूजींवर चिडलास ना तसा पुन्हा कधी चिडू नकोस.

        अरे महेश.... पण ... मी तावातावाने बोलायला लागणार तोच मला थांबवत एका हाताने महेशने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तो म्हणाला, शामभैय्या आज मी तुला माझी कहाणी सांगणार आहे. मी खूप लहान होतो. तेव्हा माझी आई देवाघरी गेली. माझे वडील मला जिवापाड जपायचे. पण मी फार हट्टी होतो. मी त्यांचं ऐकतच नसे. माझ्यासाठी ते स्वतःच्या हाताने माझ्या आवडीचं जेवण बनवायचे, मला आईची आठवण आली तर अंगाई म्हणायचे. पण एकदा मला ताप आला. बाबांनी माझ्यासाठी कितीतरी कष्ट केले. औषधपाणी केलं, रात्ररात्र जागरणं केली पण तो ताप माझ्या पायातली शक्तीच घेऊन गेला ठिकठिकाणचे दवाखाने केले, तीर्थक्षेत्री हिंडले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही ते नाहीच. जवळचे पैसे संपले. कष्ट करण्याची ताकद संपली शेवटी आजारी पडले ते. त्यांच्याकडे पाहून मला रडू येई. त्यांनी माझ्यासाठी कितीतरी कष्ट केले पण मी मात्र त्यांच्यासाठी काही करू शकत नव्हतो. भीक मागावी, तर लाज वाटते. अशातच माझे बाबा गेले अचानक मला बाबूजी भेटले. त्यांनी माझी व्यथा जाणली. मला घेऊन त्यांनी या विकलांग संस्थेत माझे नाव नोंदवले. मला या कुबड्या देऊन माझ्या पायावर उभे केले. इथे मला काम मिळाले. मुख्य म्हणजे जीवन जगण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मिळाला आणि मग मी शिकून मोठे होण्याची बाबांची इच्छा पूर्ण करायचे ठरविले. दरम्यान बाबूजींनी मला पुस्तके आणून दिली सर्व प्रकारची मदत केली. त्यामुळेच मी आज वकील होऊ शकलो. बाबूजींमध्ये मी माझे बाबा पाहतो. त्यांच्या दृष्टीतून बाबाचं वात्सल्य पाझरतयं असं मला वाटतं. आपले आई बाबा आपल्यासाठी कितीतरी धडपडत असतात. प्रेम करतात ते आपल्यावर मग ते थोडं रागावले. म्हणून आपण इतकं नाराज नाही व्हायचं, चिडायचं सुद्धा नाही.

        महेशचं बोलणं ऐकता ऐकता मी अंतर्मुख झालो होतो. त्यानं मला नवी दृष्टी दिली होती.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या