निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

नको तो रविवार - Nako To Ravivar

        वारात वार रविवार ! असं लोक का म्हणतात कोण जाणे? सुट्टीचा वार म्हणून भलेही कोणी स्तुती करो बापडे. मला तर सर्वांत नकोसा वाटणारा वार म्हणजे रविवारच ! नकोच वाटतो मला तो रविवार...

        शनिवारीच शाळेतून मी ढीगभर गृहपाठ घेऊन येतो. साऱ्या सरांना वाटतं आम्ही मोकाट असतो. मग अभ्यासाचं काय? आमच्या भवितव्याचं काय? प्रत्येक सर हे झालचं पाहिजे असा सारखा दमच देतात. पोर्शन संपत नाही या नावाखाली कोणी सर जादा तास रविवारीच घेतात.

        शाळेचा अभ्यास आणि वर अवांतर परीक्षांचे वर्ग असतातच. ड्रॉइंग, गणित, प्रज्ञा, इंग्लिश ज्युनियर सारे क्लास रविवारी. तरी बरं, संस्कृत व हिंदीच्या परीक्षांना मी बसणार नाही असं मी घरी ठणकावून सांगितलं; नाहीतर रात्र शाळेत जावं लागलं असतं. मुलांची व्यक्तिमत्वं कशी सर्वांगांनी फुलली पाहिजेत या खुळचट कल्पनांनी सकाळ नाट्यवाचनस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, विज्ञान मेळावे (!) सारे भरतात एखाद्या रविवारीच गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळा या विवेकानंदांच्या उक्तीवरून स्फूर्ती घेऊन आमचे सर मॅच ठेवतात रविवारी त्यांना काय होतंय, माझे पाय नुसते भरून येतात.

        रविवारी जरा जास्त वेळ ताणून द्यावी तर सवयीनं जाग येते ती ६ वाजताच. आई बाबा मात्र डाराडूर ! म्हणजे दूध घेणं, पाणी भरणं, तापवणं आलंच. गृहपाठाचे ढीग उपसताना बाबा म्हणतात. रविवार आहे. डोक्यावरचं जंगल कापून या. घरात असल्याचा सर्वात जास्त फायदा आई घेते. तिचे निरोप नेणे-आणणे, घर स्वच्छ करणे, बाजारहाट करणे याला माझ्याशिवाय हक्काचं कोण मिळणार? अभ्यासाचं नाव सांगावं तर कधी मेलं एक काम सांगितलं तर ही तऱ्हा, पुढे काय विचारणार आम्हांला ... हे वर आहेच.

        पिताश्रीही काही सोडीत नाहीत. वामकुक्षी करत पंख्याच्या सुखद गारव्यात पसरलेले ते फर्मान सोडतात, जरा पायावर पाय दे रे, आठवड्याचा शीण आलाय! अस्सा राग येतो. पण करणार काय? कधी एकदम माझ्या अभ्यासाची त्यांना काळजी वाटते. गरमागरम डिश चवीनं खात, मोठं कर्तव्य केल्याच्या थाटात विचारतात, काय श्रीमंत? अभ्यास वगैरे करता की नाही? अवांतर वाचन? मग त्यांच्या वेळी ते कसा अभ्यास करत, वाचन करत याच्या पुड्या सोडतात. कुसुमाग्रजांचे संपूर्ण नाव विचारले तर माझ्या अज्ञानाची कीव करून उत्तर मात्र टाळतात.

        पाहुण्यांना यायला रविवारच सापडतो. मदतीला आहेच मी ! बूट पॉलिश, सायकल पुसणं युनिफॉर्मला इस्त्री करणं, टेबल आवरणं ही माझी स्वतःची कामं करायची असतात ती रविवारीच ! त्यात पाहुण्यांची पॉलिशे, इस्त्री हे करावं लागतं. सायंकाळी टी.व्ही.वर सिनेमा पहावा म्हटला तर, आता वेळ घालव, नंबर खाली जाऊ दे मग बघतो ! - इति पिताश्री ! धड आनंद ही लुटू देत नाहीत .... मग होते रात्र. अरे बापरे! संस्कृतचे सर फाडून खाणार. दिवसभरात मालाची गाठच पडली नाही. उद्या तिलाच चालवायचे म्हणून पाठ करू लागतो तोच दिवसभर उनडायचं आणि आता मारे अभ्यासाचा आव आणलाय-झोप आता. पिताश्रीच! मनाला खूप वाईट वाटतं. पुन्हा सोमवारपासून चक्र ! ठिक आहे, झालं म्हणत मी झोपतो.

        मला सांगा. माझा रविवार थोड्या फार फरकानं हा असाच जातो. त्यात आवडण्यासारखं काही आहे?

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या