निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

सर्कशीतील हत्तीचे मनोगत - Sarkashitil Hattiche Manogat

        रसिक प्रेक्षकहो! तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटाने मला समजले तुम्ही माझ्या कामावर तुम्ही खुश झालात, मी केलेली गणरायाची पूजा, छोटया स्टुलावर एवढा मोठा देह मी सफाईदारपणे उभा केला. पुढचे पाय उभारून सोंडेने लवून मुजरा केला. लहान मुलांनी सोंडेत दिलेले पैसे शिताफीने माहुताकडे दिले. छोटया छोट्या मुलांच्या हातांनी वाजवलेल्या या त्यांनी आमच्याकडे उत्सुकतेने, कौतुकाने रोखलेले डोळे चेहऱ्यावरचा ओसंडणारा आनंद पाहून बरं वाटतं. पण मित्रांनो तुम्हांला आनंद वाटावा म्हणून मला किती यातना भोगाव्या लागतात याची कल्पना आहे का तुम्हांला ?

        अगदी लहान होतो. आईच्या मागे मागे फिरत होतो. जंगलात सगळे आम्ही कळपात राहत होतो. मुक्तपणे फिरावे नदीचे थंडगार पाणी प्यावे. रानातील गवत खावे हे आमचे मुक्त जीवन आमचे हे दिवस किती सुखाचे चालले होते. अचानक शिकाऱ्याने आम्हाला खड्डा खणून त्यात पकडले, तर आमच्या काही बांधवांना नशेची गोळी देवून पकडले. मुक्या जीवाचा मुकाआक्रोश कोणाला समजणार ? पराधीनता आली वाट्याला आमची रवानगी झाली एका सर्कसवाल्याकडे सर्कसवाला मोठा निर्दयी निःस्वार्थी लोकांच्या मनोरंजनाचे निमित्त करून अनेक प्राण्यांना त्याने पकडले. प्राण्यांचे देखील शिक्षक असतात. त्यांना रिंगमास्टर म्हणायच झाला आमच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला फार फार त्रास सोसावा लागला. पहिल्यांदा काही जमेना. आता बघा तुम्ही एवढी बुद्धिमान माणसे तुम्हांला माफ केलं जातं. आम्हाला मात्र उपवास सोसावा लागतो. उपाशी राहिल्यावर ती कृती आम्ही हळूहळू शिकू लागलो. आज तुम्हां मुलानां किती मजा वाटते. आमची करामत बघून पण आम्हाला किती वेदना होतात. आमच्या व्यथा, वेदना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

        मानवाला स्वत:ला तरी आवडते का गुलामगिरी? मग स्वतः वरून नको का त्यांनी जगाला ओळखायला. आमचे स्वातंत्र्य हिरावून घेताना त्यांना काहीच कशी शरम वाटतं नाही? आम्हा सर्वांची कायमची ताटातूट करताना. आता माझ्यासारखेच माझे बांधव संकटात सापडले आहेत. तुम्हाला वाटत असेल, की आम्हाला आयतं खायला मिळतं. सर्कस काय रोज असते थोडीच, कधीतरी काम करायचं नि रोज रोज खायचं. ते सुद्धा आयतं. काही दुखलंखुपलं तर औषधोपचारही होतो आमच्यावर. सेवाशुश्रूषाही होते. पण या साखळदंडात जखडून पडलय त्याच काय? असं बेगडी सुख काय कामाचं.

        खूप वेळा वाटतं, या सर्कशीत कसरत करण्यापेक्षा जावं पळून, पण मित्रांनो, माझी निसर्गाने देखील थट्टाच केली आहे. हे अवाढव्य शरीर, दृष्टी कमजोर भित्रा स्वभाव, बद्धिमत्ता या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दोषांमुळे कुठे पळूनही जाता येत नाही. गावोगाव फिरायचं. जिथे सर्कस तिथे मुक्काम, किती हाल होतात. आमची इच्छा असो अथवा नसो, आम्हाला जावंच लागतं. खरंच देवा काय ही आमची दैना। अल्प

        या स्वार्थी बुद्धीच्या जोरावर दुसऱ्याला स्वतःचा गुलाम बनवणाऱ्या मानवाला सद्बुद्धी दे अन् लवकरच या त्रासातून, गुलामीतून आमची मुक्तता कर.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या