निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

चित्रपट बंद झाले तर - Chitrapat Band Zale Tar

        परीक्षा चालू होती आणि उद्याच इंग्लिशचा पेपर होता. दूरदर्शनला गुढीपाडव्यानिमित्त एक गाजलेला चित्रपट लागला होता. मी अभ्यास करत होतो. घरातील सर्वजण चित्रपट पाहण्यात दंग होते. आई मात्र माझ्या छोट्या भावाचा अभयचा अभ्यास घेत होती. आईला घरातल्या सर्वाचा खूप राग आला होता. आईला वाटत होते घरातल्या माणसाने टि.व्ही. पाहू नये. ती मधून मधून टी.व्ही. बंद करायला सांगत होती. पण तिचे कोणीही ऐकत नव्हते. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले - खरोखर, हे चित्रपट बंद झाले तर किती बरे होईल !

        पण चित्रपट बंद झाले तर माणसे आपला रिकामा वेळ कसा घालवणार ? पाऊस येत असेल तर दूरदर्शन चालू केले की, चित्रपट पाहता येतात. त्यामुळे मनोरंजन होते वेळही जातो. त्यामुळे माणसांना बरे वाटते. अनेकांच्या सहकार्यातून व परिश्रमातून एक चित्रपट तयार होतो. चित्रपट बंद केले तर अभिनेते, गायक, छायाचित्रकार, दिग्दर्शक अनेक तंत्रज्ञ तसेच अनेक सहाय्यक बेकार होतील. सध्याच्या बेकारीत फार मोठी भर पडेल.

        आजकाल दूरचित्रवाणीवर अनेक वाहिन्या आपले कार्यक्रम सादर करत असतात यातील बरेचसे कार्यक्रम चित्रपटावर आधारलेले असतात. चित्रपट बंद केले तर हळूहळू दूरचित्रवाणीही बंद पडेल. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांना सहलीतील प्रवासात कोणती गाणी म्हणायची असा मोठा प्रश्न पडेल. चित्रपटातील गाण्याची माणसांना इतकी सवय झाली आहे की देवीच्या आरत्या, गाणी, गणपती उत्सवातील गणपतीची गाणी सुद्धा चित्रपटातील गाण्याच्या चालीवरती बसवली जातात.

        चित्रपट बंद केले तर अनेकांची विविध स्वप्ने भंग पावतील. काहीजणांना चित्रपट पहाताना असे वाटते की आपणही चित्रपटामध्ये काम करावे. चित्रपटांमध्ये जशी मारामारी असते तशी करावी. चित्रपट पाहत असताना कित्येकजण उगीच एखाद्या हिरोशी निगडित असतात आणि मारामारी चालू असताना मार मार करून ओरडत असतात. इतके चित्रपट पाहण्यात दंग असतात. परंतु असे स्वप्नरंजनात रंगणे धोक्याचे असते. विशेषत: असे तरूण केवळ स्वप्नात रंगून जीवनात यशासाठी प्रयत्न करणे सोडतात. जीवनाबद्दल त्यांना वैफल्य वाटू लागते. आत्महत्येसारख्या भीषण घटना घडतात. चित्रपटामुळे समाजात अनेक दुर्गुण पसरतात. चित्रपटांवर बंदी आली तर कदाचित अशा घटना टळतील.

        दहशतवाद, व्यसनाधीनता आणि हिंसा यांना आजच्या चित्रपटांत अग्रक्रम लाभला आहे. चित्रपटांमध्ये विविध फॅशनचे ड्रेस, केशरचना, चित्रपटामधील नायक-नायिका मधधुंद झालेले असतात त्यामुळे संस्कृतीचा ***ऱ्हास*** होत चालला आहे. चित्रपटामुळे कॉलेजमधील मुला-मुलींमध्ये ही संस्कृतीचा न्हास होत चालला आहे. चित्रपटातून चांगल्या गोष्टी न घेता वाईट गोष्टी आजची पिढी लवकर आत्मसात करत आहे. या गोष्टी समाजाला घातक ठरत आहे. काही चित्रपटांतून चांगल्या गोष्टी पुढे येत असल्या तरी समाजाची प्रकृती निकोप करण्यासाठी काही काळ तरी चित्रपटांवर बंदी आली पाहिजे. तरीसुद्धा लोकशिक्षण साधणाऱ्या निकोप दृष्टी च्या कलात्मक चित्रपटांमुळे आपले मनसमृद्ध होते. चित्रपट या करमणुकीच्या साधनाची शुद्धता केली पाहिजे. हे अभिरूची संपन्नता माणसांच्याच हातात आहे.

        आपली भारतीय संस्कृती जतन करणारे चित्रपट प्रक्षेपित झाले पाहिजे. संस्कृतीचा वारसा जतन करणारे चित्रपट प्रक्षेपित झाले पाहिजेत.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या