पोस्ट्स

निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

मराठी संस्कृतीचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये - Importance and Characteristics of Marathi Culture

परिचय मराठी संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा आणि अनोखा भाग आहे. महाराष्ट्र हा राज्य इतिहासातील शौर्य, साहस, धर्मभावना आणि सांस्कृतिक परंपरेने जपलेला आहे. मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्ये त्याच्या लोकांच्या जीवनशैलीत, कलात, साहित्यात आणि सामाजिक परंपरांमध्ये दिसून येतात. या संस्कृतीच्या माध्यमातून माणूस आपल्या मूल्यांना आणि सामाजिक बंधुत्वाला जोडतो. 1. सामाजिक एकता आणि सहभागिता:    मराठी संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक एकता आणि सहभागिता. मराठी लोक त्यांच्या उत्सवांमध्ये, लोककलांमध्ये आणि दैनंदिन जीवनात हे वैशिष्ट्य दाखवतात.   2. उत्सवांचा महत्त्व:    गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्री, पोलादी आणि गुडी पाडवा अशा उत्सवांचा मराठी संस्कृतीत विशेष स्थान आहे. या उत्सवांमध्ये लोक सामाजिक बंधनाचा अनुभव करतात आणि त्यांच्या परंपरांना जपतात.   3. लोककला आणि कला:    मराठी संस्कृतीत लावणी, पोवाडे, भांड, गोंदण आणि वारकारी या लोककलांचा फार मोठा वाटा आहे. या कलांमुळे मराठी संस्कृतीचे सौंदर्य जगभरात पसरले आहे.   4. आध्यात्मि...

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भविष्यातील परिणाम - Future Impact of Artificial Intelligence

परिचय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे 21व्या शतकातील सर्वात क्रांतिकारी तंत्रज्ञानांपैकी एक आहे. अल्गोरिदम आणि मशीन लर्निंगच्या मदतीने AI सक्षमपणे विचार करू शकते, निर्णय घेऊ शकते आणि मानवी क्षमतांना पूरक ठरू शकते. आज AIचा वापर  शिक्षण, आरोग्य, व्यापार, औद्योगिक उत्पादन, वाहतूक आणि कृषी यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. भविष्यात AIचा प्रभाव अधिक वाढेल आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणेल. AI चे फायदे AI मुळे अनेक क्षेत्रांमध्ये वेगवान आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्याचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत: स्वयंचलित प्रक्रिया आणि उत्पादकता वाढ – AI च्या मदतीने कारखान्यांमध्ये स्वयंचलित यंत्रे वापरली जातात, ज्यामुळे उत्पादनाचा वेग वाढतो आणि चुका कमी होतात. आरोग्य क्षेत्रातील प्रगती – AI-आधारित निदान प्रणालींमुळे डॉक्टरांना अधिक वेगाने आणि अचूकपणे रोग ओळखता येतात. उदाहरणार्थ, IBM Watson हे AI तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय निदानासाठी वापरले जाते. शिक्षणातील क्रांती – AI च्या मदतीने ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्म, स्मार्ट ट्युटरिंग सिस्टीम्स आणि ...

सोशल मीडियाचा तरुणांवर परिणाम - Effect of Social Media on Youth

परिचय आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन बनले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब आणि स्नॅपचॅट यांसारख्या प्लॅटफॉर्म्समुळे जग अधिक जवळ आले आहे. या माध्यमातून तरुणांना जगभरातील माहिती, शिक्षण, करिअरच्या संधी आणि संपर्क मिळतो. मात्र, त्याचा गैरवापर किंवा अतिरेक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. सोशल मीडियाचे फायदे सोशल मीडिया योग्य प्रकारे वापरल्यास तो एक अमूल्य साधन ठरू शकतो.   शैक्षणिक आणि कौशल्यविकास – ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा वाढल्या आहेत. यूट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओ, कोर्सेस, वेबिनार यामुळे अनेकांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाइन यांसारख्या कौशल्यांचे ऑनलाईन शिक्षण घेऊन अनेक तरुण फ्रीलान्सिंग किंवा स्टार्टअप्स सुरू करत आहेत.    करिअर आणि व्यवसायाच्या संधी – सोशल मीडिया हे व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तम साधन आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून अनेक उद्योजक स्वतःचा ब्रँड विकसित करतात. लिंक्डइनवर प्रोफेशनल नेटवर्किंग करून नोकरीच्या उत्तम संधी शोधता येतात.   साम...

माझे वडील- माझे आवडते व्यक्तिमत्व My Father- My Favorite Personality

    जगभरात असे बरेच लोक आहेत ज्यांनी महानता प्राप्त केली आहे आणि लोक त्यांच्याकडे पाहतात. अनेक सेलिब्रिटी, नेते आणि कलाकार अनेक लोकांसाठी प्रेरणा म्हणून काम करतात. अशा प्रकारे, प्रत्येकाचे आवडते व्यक्तिमत्व असते ज्याची ते प्रशंसा करतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे सहसा एक सुप्रसिद्ध व्यक्ती असते. पण, माझ्यासाठी, माझे आवडते व्यक्तिमत्व हे जगभरात प्रसिद्ध नसून आमच्या कुटुंबात प्रसिद्ध असलेले माझे वडील आहेत.     मी मोठ्या होत असलेल्या सेलिब्रिटींकडे बघायचो आणि त्यातले बरेच जण माझे आदर्श होते. पण, जसजसे मी मोठे होत गेले, तसतसे मला जाणवले की माझे आवडते व्यक्तिमत्व माझ्यासमोर आहे. माझे वडील ज्यांच्यासोबत मी राहतो, खातो आणि झोपतो. त्यानेच मला एक चांगला माणूस बनण्यास मदत केली आहे. शिवाय, माझ्या निरोगी आणि संरक्षित जीवनासाठी मी माझे वडील त्यांचे आभार मानतो. माझे वडील एक दयाळू माणूस आहेत जे अतिशय सभ्य आहेत. त्याला नेहमी इतरांची मदत करायला आवडते.     शिवाय, तो आपल्याला चांगले शिष्टाचार देखील शिकवतो आणि आपल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करतो. तो अतिशय व...

एका हुतात्मा स्मारकाचे मनोगत - Eka Hutatma Smarakache Manogat

        या भरचौकात वर्षानुवर्षे उभं राहून राहून माझे पाय शिणलेत. नको नको ते या कलियुगातले नेते, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, पायदळी तुडवले जाणारे सत्य, शिव आणि सौंदर्य, माणुसकीवरच झालेला अत्याचार, गोरगरिबांच्या किंकाळ्या त्यांचे विलाप हे सगळं पाहून नेत्र शिणलेत. कान शिणलेत.         असंख्य चांदण्या आकाशात चमचमताहेत पण या नीरव शांततेत माझ्या मनातल्या विचारांचा हल्लकल्लोळ कुणाला ऐकू तरी जाईल का? कोण ऐकणार माझे दुःख? कोण पुसणार माझे अश्रु?         खरचं काय चाललंय तरी काय? स्वच्छ खादीचे कपडे घालून स्वावलंबी जीवन जगणारा गोरगरिबांची आत्मियतेने सेवा करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी आयुष्य वेचलं. स्वातंत्र्याच्या आंदोलनात एक सच्चा शिपाई म्हणून मी लढलो. कधी कशाचीही अपेक्षा कुणाकडूनही केली नाही. आज मात्र मृत्युनंतर या पुतळ्याच्या रूपानं माझे हे चिंडवडे का निघताहेत तेच कळत नाही.         इथे ना कुणी कधी साफसफाई करत ना कुणी मान वर करून इथला ताम्रपट वाचत. माझं सदेव उन्नत असलेलं हे मस्तक आता जणू कावळ्यांसाठी आ झालयं. जे मस्तक...

बेकार तरुणाचे मनोगत - Bekar Tarunache Manogat

          एकदा एका ऑफिसच्या बाहेर भली मोठी रांग दिसली. या रांगेत सर्व तरुण मंडळी होती. माझ्या मनात उत्सुकता जागृत झाली. ही सर्व मंडळे इथे कशासाठी जमली आहेत? कुतूहलाने मी तिथे उभा राहिलो. अन् त्यातल्या एका तरुणाला त्याबाबत विचारले. त्यावर तो जरा चिडलाच, काय राव थट्टा करता काय आमची? हसा, हसा आता हसताय, पण बाळांनो, शिक्षण झाल्यावर तुम्हालाही यायचंय आमच्या सारख्यांच्या रांगेत. खूप पायपीट करायची शिवाय टोणगा, घोडा, आयतं बसून खातो, लाज नाही वाटत, तुलाच कशी लागत नाही नोकरी? अशी मुक्ताफळे ऐकायची.           मी त्या तरुणाला विश्वासात घेतले, जेव्हा त्याला खात्री पटली मी त्याची चेष्टा करीत नाही तेव्हा तो मनातली व्यथा सांगायला तयार झाला.           काय सांगू दोस्ता तुला, माझं नाव विचारू नकोस. माझं नाव सध्या बेकार तरूण. माझा ठाव ठिकाणा जिथे जाहिरात तिथे अर्ज घेवून जाणे, मुलाखतीला रांगते बसणे, नंतर निराशा पदरी घेवून याच गोष्टीची पुनरावृत्ती काय सांगू तुला. आजकाल जगणं मुश्किल होऊन बसलयं. आईवडिलांना आम्ही मुलं ओझ वाट...

पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त - Pinjaryatil Popatache Atmavrutta

          चला बरे झाले, सर्वजण आपापल्या कामात गुंतलेत नाहीतर जो तो येतो आणि पोपटा राम राम म्हण पोपटा मिठू मिठू बोल असे म्हणून मला हैराण करतात. मला या घरातील हा लहान मुलगा फार आवडतो. तो एकटक माझ्याकडे बघत राहतो. मध्येच हसतो, टाळ्या वाजवतो. त्याच्याकडे पाहातच मी हे कारावासाचं लाजिरवाणं जीवन कसं तरी गोड करून घेतो. लाजिरवाणं नाहीतर काय? इथे काही देशभक्तीच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे ही कैद मिळालेली नाही की अभिमान वाटावा. अर्थात गुन्हेगारीची खंतही नाही. केवळ माणसाच्या प्राण्यांवरील पक्ष्यांवरील प्रेमाचाच हा प्रसाद आहे. काय? पण गंमत काय आहे नाव द्यायचं भूत दया आणि परिणाम कारावास.           'आज मी या पिंजऱ्यात एकटा, एकाकी जीवन जगतो आहे. दिलं ते ते खातो आहे, पाजलं ते पितो आहे. या सान्यांच्या दृष्टीने मी एक खेळण बनलो आहे. असा एकान्त लाभला की, मला माझे बालपण आठवते. मी मनसोक्त विहार करत होतो. बाहेरच्या जगात, रानावनात फिरत होतो. आवडेल ती फळे झाडावर बसून खात होतो. पिंजऱ्यात अडकल्यामुळे मी बाहेरच्या हवेत फिरू शकत नाही.      ...