निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

जाहिरातीचे युग - Jahiratiche Yug

        जाहिरात .... हा आजच्या काळाचा जणू परवलीचा शब्द झाला आहे. दूरदर्शन असो, आकाशवाणी असो वा वृत्तपत्रे असोत. एवढेच नव्हे तर एखादा चांगला कार्यक्रम असो वा स्पर्धा असोत जाहिराती आपल्या सर्वत्र बस्तान ठोकूनच बसलेल्या दिसतात. कोणत्याही चांगल्या मालिके अगोदर या कार्यक्रमाचे प्रायोजक...... अशा अनंत जाहिराती पाहणे भाग पडते. रेडिओवरही कार्यक्रम चालू असतात. गाण्यांच्या अधेमधे ही जाहिराती ऐकाव्या लागतात. आपली इच्छा असो वा नसो जाहिराती शिवाय आपण दूरदर्शन, आकाशवाणीचे कार्यक्रम पाहू वा ऐकू शकत नाही हे सत्य आहे.

        हल्ली तर जाहिराती, कंसाला जसा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कृष्ण दिसू लागला होता ना तथा जागोजागी दिसतात, एकही सार्वजनिक जागा या जाहिरातींच्या तडाख्यातून सुटलेली दिसत नाही. असं का? या प्रश्नचिन्हाला एकच उत्तर आहे, ते म्हणजे व्यापार व्यवसाय.

        जाहिरात हे व्यापार करण्याचे, व्यवसायाच्या वाढीचे एक साधन झाले आहे. असे म्हटले जाते की उत्कृष्ट जाहिरातीमुळे निकृष्ट मालसुद्धा हा हा म्हणता खपतो. पण निकृष्ट जाहिरातीमुळे उत्कृष्ट माल मुळीच खपत नाही.

        आज आपण पाहिले तर तेल, साबण शॅम्पू, औषधे, वस्त्रे, भांडीकुंडी, प्लास्टिक वस्तू, अशा अनेक गोष्टींचा जाहिरातींची रेलचेल बाजारात दिसते. जी जाहिरात सर्वात जास्त आकर्षक व उपयुक्तता जाणवून घेणारी असेल त्या मालाची विक्री झटकन वाढते. या जाहिरातींचे सुद्धा आता एक शास्त्र बनले आहे. जाहिरात हा देखील एक मोठा व्यवसाय बनला आहे. जाहिरात तयार करणारे कलाकार, तंत्रज्ञ, मध्यस्थ या सर्वांसाठी हा एक पैसे मिळवून देणारा व्यवसाय झाला आहे.

        एकेकाळी आपल्या मालाच्या चांगल्या दर्जाबद्दल ग्राहकांना अधिक कल्पना देण्यासाठी वापरली जाणारी जाहिरात आता मात्र सुमार दर्जा लपवण्यासाठी वापरली जावू लागली आहे. मुळीच जाहिरात न करता आता कोणतेही उत्पादन बाजारपेठेत उभे राहू शकत नाही. कारण जाहिरात तंत्र आणि मंत्र यांचा चांगला उपयोग करून घेतल्याशिवाय स्पर्धेच्या या जगात कोणत्याच उत्पादनाला जागा मिळू शकत नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की 'जाहिरातीचे युग' हे जाहिरातीचे.

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या

Omkar bengali म्हणाले…
Ha nibhandha khup upyogi padla
Gaurav Harke म्हणाले…
धन्यवाद...